कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीचे छापे….!

विशेष वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आज ईडीने छापे टाकले आहेत. बँकेच्या मूख्य शाखे सह सेनापती कापशी शाखेवर देखील छापे पडले आहेत.  जिल्ह्याचे आर्थिक  केंद्र असलेल्या बँकेवर छापे पडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.ब्रिक्स इंडिया कंपनीला दिलेल्या कर्ज प्रकरणी  ईडीचे अधिकारी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु करत आहेत. 

Advertisements

   ११ जानेवारी रोजी हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते……

गेल्या महिन्यात ११ जानेवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ यांच्या वेगवेगळ्या निवासस्थाने, तसेच त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापेमारी केली. या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासणे मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला होता. 

दुसरीकडे, ११ जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते. शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपाच्या मागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका म्जुज सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली होती. या कारवाईनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *