Share Now
विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर : कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरातील सूर्या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून पहाटेच्या दरम्यान उडी घेऊन एका रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली.शिरोली पुलाची येथिल ४४ वर्षीय जयसिंग ज्ञानदेव कणसे असे त्या रुग्णाचे नावं असून सूर्या हॉस्पिटल मध्ये उपचारा साठी ते दाखल झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पहाटेच्या वेळी हॉस्पिटल मध्ये दाखल असणाऱ्या जयसिंग कणसे यांनी कोणाचे लक्ष नसलेले पाहून पहिल्या मजल्यावरून उडी घेतली. वरून खाली पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटल कडून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच हॉस्पिटल मध्ये नातेवाईकांनी गर्दी केली. घटनेची सर्व माहिती हॉस्पिटलने लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली असून घटनेची सर्व चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
Share Now