जागरुक पालक सुदृढ बालक अभियान अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील २४६६ बालकांची आरोग्य तपासणी…

कोल्हापूर : जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाअंतर्गत शहरातील ० ते १८ वयोगटातील २४६६ बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ० ते ६ वयोगटातील २९७ इतक्या मुलांची व ६ ते १८ वयोगटातील २१६९ इतक्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या मुलांपैकी आजारी असलेल्या १६१ मुलांना औषधोपचार करण्यात आले आहे तर त्यापैकी दोन मुलांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या सुचनेनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये गुरुवारपासून जागरुक पालक सुदृढ बालक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ सकाळी रदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत, आरोग्य सेवा प्रधान सचिव व आयुक्त संजय खंदारे, अभियान संचालक धीरज कुमार, आरोग्य संचालक डॉ.नितीन आंबार्डेकर, एनएचएमचे सह संचालक डॉ.विजय कंदेवाड यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हा, महानगरपालिका, जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय व सर्व आरोग्य संस्था यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.

जागरुक पालक सुदृढ बालक अभियान प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या ११ प्राथमिक नागरी आरोग्य आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यामध्ये गुरुवारी प्राथमिक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.५ कसबा बावडा अंतर्गत न्यू मॉडेल इंग्लिश मेडियम स्कूल या शाळेत या अभियानाची सुरूवात करण्यात आली. यावेळी आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने, मेडिकल ऑफिसर डॉ.सोनाक्षी पाटील व स्टाफ, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी मुरलीधर गावडे, साताप्पा मगदुम तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.

तरी शहरातील ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *