पंचमहाभूत लोकमहोत्सवाचा शिवजयंती दिनी भव्य मिरवणुकी सह पंचगंगा नदी महाआरती ने प्रांरभ….!

कोल्हापूर  : विविध राज्यासह परदेशातील विविध मान्यवर प्रतिनिधी सहभागी असणाऱ्या सिद्धगिरी कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ शिवजयंती दिन रविवारी भव्य मिवणुकीसह पंचगंगा नदी येथे सामुदायिक आरतीने होत आहे. त्यामध्ये सर्वांनी यामध्ये आपला सहभागी नोंदवावा ,असे हितगुनपर आवाहन परमपूज्य काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी केले आहे . शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदानामधून या या मिरणुकीचा शुभारंभ होणार असून त्यामध्ये त्यातून बिनखांबी गणेश मंदिर – महाद्वार रोड पापाची तिकटी मार्गे गंगावेश पंचगंगा नदी या ठिकाणी ही मिरवणूक विसर्जित होईल त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह पालकमंत्री दीपक केसरकर ,उद्योगमंत्री उदय सामंत तसेच राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आरती होणार आहे . विविध चौदा राज्यातील पारंपारिक लोकवाद्यासह कलाकारांचा सहभाग आणि त्यांचे सादरीकरण तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवना आधारित चित्रे, त्यांचे पर्यावरण विषयक विचार यांचे प्रदर्शन हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील गोजेगाव येथील ११ जणांचे घडशी – गुरव समाजाचे सामुदायिक तुतारी वादन पथक हे मुख्य आकर्षण असणार आहे तरी या सर्वांचा नागरिकांनी स्वतःहून सहभागा सह लाभ घ्यावा आणि येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कणेरी मठ परिसरात होणाऱ्या या पंचमहाभूत उत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे ,असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी केमटीची मोफत प्रवास सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे असून त्याचाही लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समिती च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *