मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर…!

कोल्हापूर :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १.३५ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराकडे प्रयाण. दुपारी १.४५ वाजता महालक्ष्मी मंदीर येथे आगमन व दर्शनाकरिता राखीव. दुपारी २.१५ वाजता महालक्ष्मी मंदीर येथून मोटारीने राजर्षी शाहू महाराज पुतळ्याकडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम. दुपारी २.३५ वाजता हॉटेल पंचशीलकडे प्रयाण. दुपारी २.४० वाजता पंचशील हॉटेल येथे आगमन व राखीव. दुपारी ३.१० वाजता पंचशील हॉटेल येथून लोहिया हायस्कूलकडे प्रयाण. दुपारी ३.१५ वाजता केंद्रीय गृह मंत्री महोदयांसमवेत द न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर शताब्दी महोत्सव समारोप समारंभ व शतसंवत्सरी स्मरणिका प्रकाशन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: लोहिया हायस्कूल) दुपारी ४.३० वाजता लोहिया हायस्कूल येथून गंगावेशकडे प्रयाण. दुपारी ४.४५ वाजता पंचमहाभूत लोकोत्सव महाशोभा यात्रेत सहभाग. (स्थळ: गंगावेश ते पंचगंगा घाट) सायंकाळी ५.३० वाजता पंचगंगा घाट येथे आगमन व पंचगंगा महाआरतीस उपस्थिती. सायंकाळी ६.१० वाजता पंचगंगा घाट येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी ६.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने आग्राकडे प्रयाण.

सोमवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री १ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने कोल्हापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. रात्री १.१५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी १.३५ वाजता मोटारीने महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराकडे प्रयाण. दुपारी १.४५ वाजता महालक्ष्मी मंदीर येथे आगमन व राखीव. दुपारी २.१५ वाजता शिवाजी चौकाकडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण. (स्थळ: शिवाजी चौक) राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण. (स्थळ: दसरा चौक) दुपारी २.३५ वाजता हॉटेल पंचशीलकडे प्रयाण. दुपारी २.४० वाजता पंचशील हॉटेल येथे आगमन व राखीव. दुपारी ४.३० वाजता भाजपा कार्यालय, विन्स हॉस्पिटल, नागाळा पार्क कडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता विजय संकल्प रॅलीस उपस्थिती. सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल पंचशीलकडे प्रयाण. सायंकाळी ७ वाजता हॉटेल पंचशील येथे आगमन व राखीव. सायंकाळी ७.३० वाजता हॉटेल पॅव्हेलियनकडे प्रयाण. रात्री ८ वाजता हॉटेल पॅव्हेलियन येथे आगमन व बैठकीकरिता राखीव. रात्री ९ वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री ९.२५ वाजता विमानतळ येथे आगमन. रात्री ९.३० वाजता गृह मंत्री अमित शाह यांच्या प्रयाण प्रसंगी उपस्थित. रात्री ९.४५ वाजता कोल्हापूरकडे प्रयाण व राखीव.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *