कोल्हापूर : एक नव्हे दोन नव्हे गेली पंचवीस वर्ष सलग कत्तलखान्यात नेणाऱ्या गाई मठावर सांभाळल्या जातात….अनेक भाकड गाई, कोणते हि उत्पन्न नसताना मठ सांभाळत आहे. साधं कुत्र पाळण्याची लायकी नसणारी मंडळी आज मठाच्या गाईंच्या विषयीच्या बातम्यांवर चर्चा करत आहे हि बाब नवल आहे.
एक गाई सांभाळणे, ती हि दुध देणार नाही, काही उत्पादन देणार नाही अशा गाईला हि कोणतीही अपेक्षा न ठेवाता मठ सांभाळ करतो. मठावरील गोशाळेतील एक हि गाई तुम्हाला कुपोषित दिसणार नाही. सर्व गाईंची तशी काळजी घेतली जाते. देश भरातील सुमारे २२ देशी प्रजातींच्या हजारो गाई सांभाळल्या जातात. दर महिन्याला मठ कोठ्यावधी रुपये गाईंच्या संगोपनावर खर्च करतो.
ज्या गाईंचे वासरू जन्माला आल्यावर गाई दुध देत नाही त्या वासराला ही पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी दुसऱ्या गाईचे दुध स्वतःच्या हाताने पाजतात. पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी ज्या वेळी गोशाळेत जातात त्यावेळी सर्व जनावर त्यांच्या भोवती लगेच गोळा होतात, अगदी वात्सल्याने आपली काळजी घेणारी व्यक्ती म्हणून ते स्वामीजींना अगदी बिलगतात. स्वामीजींचा हात प्रत्येक जनावराच्या पाठीवरून फिरताना त्या प्रत्येक गाईची भाव पहिला तर गोपालना विषयी कोणाला हि प्रश्न पडणार नाही.
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्या सह देशभरातून दररोज ७ ते ८ लाख लोक मठावर येत आहेत. सुमारे ६५० एकर परिसरावर बघेल तिकडे लोकच लोक आहेत. अशा वेळी गुरुवारी दत्तगुरूंची गाई म्हणून गाईला काही उत्सवात सहभागी होणाऱ्या काही भाविक वृत्तीच्या लोकांनी अज्ञानाने गाईना अन्न घातले. यात १२ गाई दगावल्या. इतर सर्व गाईंच्यावर यशस्वी उपचार करण्यात यश आले. आज घडीला एक हि गाई वैद्यकीय दृष्ट्या असक्षम नाही. सगळ्या गाई बऱ्या झाल्या आहेत हे मठाच्या प्रशासनाचे व हितचिंतकाचे यश आहे, तरी हि गाईच्या मृत्यूचा आकडा फुगवून सांगितला जात आहे, यावरून मठाला बदनाम करण्यात काही मंडळी किती अग्रेसर आहेत हे लक्षात येते. तरी लोक सुज्ञ आहेत, त्यांना काही विघ्न संतोषी मंडळीनी फुगवलेला आकडा व मठाचा द्वेष लगेच लक्षात येतोच. त्यामुळे आज हि मठावर दररोज लाखो लोकांची संख्या वाढत आहे.