कोल्हापूर – दहावीच्या परीक्षेत ९० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक गुणांस उत्तीर्ण होणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना मेडिकल अथवा इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी तसेच कोचिंग क्लासेसमधून तयारी करून घेण्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासनाने बार्टीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरु करण्याचा प्रस्ताव बार्टीने शासनास सादर केला आहे. या प्रस्तावाबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करून या योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
सद्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे या अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांच्याकडून राज्यातील महत्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आमदार पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत ९० किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण होणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या विशेष अनुदानाचा प्रश्न उपस्थित केला.
या विद्यार्थ्यांना मेडिकल अथवा इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी तसेच कोचिंग क्लासेसमधून तयारी करून घेण्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासनाने बार्टीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरु केल्याचे जानेवारी २०२३ मध्ये किंवा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे. हे खरे आहे काय असल्यास सन २०२० मध्ये ही योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर ४५०० विद्यार्थ्यांनी या योजनेतर्गत अर्ज केले असून या योजनेचा प्रत्यक्ष लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना क्लासेस सोडावे लागले आहेत. हेही खरे आहे काय खरे असल्यास दहावीच्या (एस.एस.सी.) परीक्षेत ९० टक्के अथवा त्यावरील गुणांस उत्तीर्ण होणाऱ्या अनुसूचित जातीतील गरीब विद्यार्थ्यांना जेईई, नीट, सीईटी यासारख्या कलांच्या तयारीसाठी वर्ग ११वी व १२ वी या दोन वर्षात प्रति विद्यार्थी प्रत्येकी १ लाख रुपये असे एकूण २ लाख रुपये देण्याबाबतचा सुधारित प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कार्यालयाने शासनास सादर केला असून या प्रस्तावाबाबत कोणती कार्यवाही झाली अशी विचारणा केली आहे तसेच याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय चौकशीच्या अनुषंगाने योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना काय कार्यवाही केली किंवा करण्यात येत आहे. केली नसल्यास बिलाची कारणे काय आहे असा प्रश्नही आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आमदार पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, दहावीच्या परीक्षेत ९० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक गुणाने उतीर्ण होणार्या अनुसूचित जातीतील गरीब विद्यार्थ्याना जेईई नीट सीईटी सारख्या परीक्षेच्या तयारीसाठी ११ वी आणि १२ वी या दोन वर्षात प्रति विद्यार्थी प्रत्येकी एक लाख असे एकूण दोन लाख रुपये देण्याबाबतचा सुधारित प्रस्ताव बार्टी कडुन सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत शासन स्तरावर विचाराधीन आहे असे स्पष्ट केले आहे.