फ्रान्स येथे झालेल्या १० इंटरनॅशनल चित्रकला स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील दिव्यांग तरुणाची सुवर्ण पदकाला गवसणी.

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 51 Second

(अनिल खंडागळे-प्रतिनिधी) 

रायगड :- रायगड जिल्ह्यातील पाली-सुधागड येथील तळई गावचा सुपुत्र चेतन पाशिलकर या तरूणाने आपल्या मेहनतीच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर फ्रान्स येथे झालेल्या “१० व्या इंटरनॅशनल एबीलिंम्पिक्स चित्रकला स्पर्धेत” पहिले सुवर्ण पदक पटकावुन नवा इतिहास रचला आहे.खरतर परिस्थितीपुढे हतबल झालेल्या अनेक तरुणांनी चेतनकडून आदर्श घ्यावा,असच म्हणावे लागेल कारण चेतन हा जरी(दिव्यांग) कर्णबधीर असला तरी आपल्या या शारिरिक व्यंगाला कसलीही अडसर न समजता त्यांनी केलेल परिश्रम आणि त्यातुन केलेल कार्य हे देदीप्यमान आहे,कौतुकास्पद नक्किच आहे.

        चेतन पाशिलकर या तरुणाला सुरूवातीपासुनच चित्रकलेची खुप आवड होती.त्यांनी चित्रकला पदवी प्रथम श्रेणीने जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स मुंबई विद्यापीठातुन पुर्ण केली.अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कलेचा अविष्कार दाखवून सन्मान प्राप्त केला आहे.त्यात प्रामुख्याने १० सुवर्ण पदके,२६ इतर पदके,३० चषक,११५ हुन अधिक प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.यातच नुकत्याच फ्रन्स येथे झालेल्या “१० व्या एबीलिंम्पिक्स स्पर्धेत” त्यांनी पटकावलेल सुवर्ण पदक हि निश्चितच पाली-सुधागड वासियांसाठी,तळई ग्रामस्थांसाठी,रायगड करांसाठी आणि महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.कारण चेतन पाशिलकर यांनी आपल्या चित्रकलेच्या जोरावर देशाच नाव जगभर केल आहे.कारण ४० वर्षानंतर भारताला हे सुवर्ण पदक मिळवून देणारा चेतन पाशिलकर हा हिरो असल्याची भावना त्याच्या चाहत्यांकडुन व्यक्त केली जात आहे.रायगड,महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरातुन चेतनवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

         “युवा पत्रकार संघ-रायगड जिल्हयासह महाराष्ट्र राज्य” यांच्याकडून देखील चेतन पाशिलकर यांनी केलेल्या कामगिरीच कौतुक आणि अभिनंदन.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *