Getting your Trinity Audio player ready...
|
दिपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी
रायगड:-इंदापूर येथे दिनांक ०२ एप्रिल रोजी “भारतीय मजदुर संघ संलग्न जीडीएस युनियन भारतीय ग्रामीण डाक सेवक कर्माचार्यांचा प्रथम अधिवेशन संपन्न झाला तसेच भारतीय खाते बाह्य डाक कर्मचारी संघटनेचा उद्घाटन सोहळा सुधाकर कावडेजी (अध्यक्ष भारतीय खाते बाह्य टडाक कर्मचारी संघटना महाराष्ट्र आणि गोवा सर्कल) यांच्या प्रमुख उपस्थित व मार्गदर्शनाखाली पार पडला असुन या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणुन रमेश अंजारीया (भारतीय डाक कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष) उपस्थित होते तसेच संघटनेचे शेकडो कर्मचारी उपस्थित होते.यावेळी रायगड जिल्हा कार्यकारणी निवड करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी सुनिल मनोहर महालुंगे व सचिवपदी विनोद बाबू करकरे यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी बोलताना सुधाकर कावडेजी यांनी बोलताना सांगितल कि,आपली संघटना कर्मचार्यांच्या न्याय हक्कासाठी सक्रिय असुन त्यांना न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध आहे. देशपातळिवर या संघटनेचे असंख्य सभासद आहेत.
त्याप्रसंगी राम जमनु (अध्यक्ष भारतीय मजदुर संघ मुंबई),मिलिंद कांबले, जनार्दन बने ,प्रशातजी तोरस्कर, बाबासाहेब देशमुख,नागेश हुंडेकर,विनोद राऊत तसेच भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा सचिव अशोक निकम,ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रमेश गोविलकर ,चेतन देशमुख ,रोहिदास शेळके हे उपस्थित होते.