कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ यांच्यावतीने “चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला मंगळवारी दि. ४ एप्रिल पासून सुरूवात होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चषक, उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चषक, तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती सत्यजित चंद्रकांत जाधव व संस्थेचे अध्यक्ष राजू साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नेताजी तरुण मंडळाच्या वतीन ४ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती मालोजीराजे, डी. वाय. पाटील ग्रुपचे संजय डी. पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, डॉ. प्रतिक राऊत यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. उद्घाटनाचा सामना फुलेवाडी फुटबॉल क्लब आणि बीजीएम स्पोर्टस यांच्यात होणार आहे. तर स्पर्धेतील पहिला सामना सम्राट नगर फुटबॉल क्लब व संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात दुपारी दोन वाजता होणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ३१ हजार रुपये, गौरव चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवले जाणार आहे. प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा बहुमान मिळवणाऱ्या खेळाडूला ३१०० रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.