Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : काही दिवसांपूवी कोल्हापुरातील कागल येथी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या तीन वेळा पुणे आणि कागल येथील घरावर धाड पडली होती हे प्रकरण ताजे असता आता कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या आणखी एका आमदाराला ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील सुद्धा ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात एकचं खळबळ उडाली आहे पी. एन. पाटील हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असून ते आज स्वतःहून मुंबई येथील ईडी कार्यालयात दाखल झाले. मात्र, आज त्यांची चौकशी करण्यात आली नाही. त्यांना पुन्हा एकदा नव्याने समाज बजावून चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. पी. एन. पाटील यांना यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये ईडीकडून समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. काही दिवसांपूर्वी सेनापती कापशीमधील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडहिंग्लज तालुक्यातील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ईडीकडून छापीमारी करण्यात आली आहे. या संदर्भात आतापर्यंत ईडीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर तीनवेळा छापेमारी करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांचीसुद्धा चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे.