शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 59 Second

कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने उमेदवारांची घोषणा केली आहे. या निवडणुकीत विरोधी आघाडीचे २९ उमेदवार अपात्र ठरल्याने पॅनेलमध्ये कोणाकोणाला संधी मिळते याविषयी उत्सकुता होती.

आमदार पाटील यांनी परिर्वतन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक एकमध्ये शालन बाबुराव बेनाडे रुई, किरण बाबासो भोसले रुकडी तर व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक दोनमध्ये शिवाजी ज्ञानू किबिले कुंभोज, अभिजीत सर्जेराव माने भेंडवडे, दिलीप गणपतराव पाटील टोप यांची उमेदवारी आहे. सभासद गट क्रमांक तीनमधून विलास शंकर पाटील भुये, विठठल हिंदुराव माने वडणगे, बळवंत रामचंद्र गायकवाड आळवे तर सभासद गट क्रमांक चारमध्ये दिनकर भिवा पाटील वाशी, सुरेश भिवा पाटील वाशी, संभ्घजी शंकरराव पाटील वाशी तर गट क्रमांक पाचमध्ये विजयमाला विश्वास नेजदार कसबाबावडा, मोहन रामचंद्र सालपे कसबा बावडा यांना उमेदवारी आहे.

व्यक्ती सभासद गट क्रमांक सहामधून दगडू मारुती चौगले धामोड, शांताराम पांडूरंग पाटील सावर्धन हे उमेदवार आहेत. महिला गटात पुतळाबाई मारुती मगदूम कांडगाव, निर्मला जयवंत पाटील निगवे दुमाला यांना उमेदवारी आहे. अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गटात बाबासो थळोजी देशमुख शिरोली पुलाची तर इतर मागास प्रतिनिधी गटात मानसिंग दत्तू खोत नरंदे तर भटक्या विमुक्त जमाती प्रवर्ग गटात आण्णा विठ्ठू रामाण्णा वसगडे हे उमेदवार आहेत. संस्था प्रतिनिधी गटात वसगडे येथील सचिन नरसगोंडा पाटील हे निवडणूक लढवित आहेत.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत यंदा कमालीची चुरस निर्माण झाली आहे. विरोधी आघाडीचे नेते आमदार पाटील यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावांचा दौरा, सभासद संपर्क मोहिम राबवून प्रचाराला गती दिली आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *