Share Now
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल माजी आमदार अमल महाडिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून जाहीर पणे दिलगिरी व्यक्त केली.
काय म्हणाले अमल महाडिक…
होय, आम्ही लोकशाही मानतो.. संविधानाचा आदर करतो.. बाबासाहेबांचा सन्मान करतो.. म्हणूनच ही दिलगिरी !
मी लोकशाहीसाठीच बिंदू चौकात आलो होतो. राजाराम कारखान्यामध्ये लोकशाही पद्धतीने सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया काही लोकांना बघवत नाही. त्यामुळे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने मी बिंदू चौकात खुलासा देणार होतो.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मी लोकशाही तत्वावर विश्वास ठेऊन काही काळ ‘चर्चेसाठी त्यांची वाट पाहिली. आणि ते समोर येणार नाहीत समजल्यानंतर तिथून बाहेर पडलो. तरीही झालेल्या घटनेमुळे कुणाची मने दुखावली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
Share Now