जयसिंगपूर प्रतिनिधी सूरज राजपूत
जयसिंगपूर: चिंचवाड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून गावच्या विकासासाठी माझ्या कडून जास्तीत-जास्त मदत करण्यासाठी मी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी दिली. चिंचवाड येथे वाघजाई यात्रेनिमित्य आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटणप्रंसगी श्री. घाटगे बोलत होते. यावेळी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ चेअरमन माधवराव घाटगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मैदानात ५० हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या.
यावेळी बोलताना माधवराव घाटगे म्हणाले, ग्रामीण भागातील तरुणांना कुस्तीची आवड निर्माण होण्यासाठी व कुस्तीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे आहे. त्या उद्देशानेच चिंचवाडमध्ये वाघजाई यात्रेनिमित्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. प्रशांत जगताप यांने एकलंगी डावावर पै. कुमार पाटील यांना आस्मान दाखवत विजय मिळवला. व्दितीय क्रमांकाची कुस्ती श्रीमंत भोसले यांने पै. बाबा राणगे यावर मात करीत जिंकली तर तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. विशाल शेळके जखमी झाल्याने पै. अभिजीत कणिरे याला विजयी घोषित केले. तसेच महिला कुस्त्याच्या तीन लढती रंगीतदार झाल्या.
सर्व विजेत्यांना गुरुदत्त शुगर्स चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे, घाटगे फुडस् अँण्ड मिल्क चे डायरेक्टर अदित्य घाटगे, महाराष्ट्र राज्य वरीष्ठ कुस्तीगीर परिषदचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते , खजिनदार पै. अमृता भोसले, सरपंच जालिंदर ठोमके यांच्या हस्ते गदा व रोख रक्कम स्वरूपात बक्षिस देऊन गौरण्यात आले. यावेळी माजी आरोग्य राज्यमंत्री आम.डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) माजी आमदार उल्हास पाटील, माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, दत्त नागरी पत संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने- देशमुख, माजी नगरसेवक बजरंग खामकर, अजित चौगुले, सुदर्शन ककडे, भरत माणगावे, प्रमोद ककडे, आण्णासो ककडे , उपसरपंच वैभव गोधडे ,सर्व ग्रामपंचायत सदस्य , विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जालिंदर ठोमके ,सुनिल चव्हाण,शरद गोधडे, युवराज गोधडे, दीपक नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले. निवेदक म्हणून नंदु सुतार व महेश घोटणे यांनी काम पाहिले.