धाटाव औद्योगिक वसाहतीमधील “प्रीव्हि लाईफ सायन्स प्रा.लि” कंपणीच्या गलथाण कारभाराविरोधात “श्रीशिवशंभो युवा संघ आक्रमक” पवित्र्यात…!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 36 Second

अमर पवार-रोहा प्रतीनिधी

रोहा :- मागील काहि दिवसापासुन प्रदुषित पाण्याच्या ठिसाळ नियोजनाबाबतीत बहुचर्चीत असणारी धाटाव औद्योगिक वसाहत या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते.असाच कहिसा प्रकार प्रीव्हि लाईफ सायन्स प्रा.लि कंपणीच्या आवारात १४ एप्रिला लगबग साय ०५:०० च्या सुमारास पहावयास मिळाला.काहि दिवसापासुन प्रीव्ही कंपणीच्या आवारातील प्रदूषित रासायनिक पाणी कोणतीही प्रक्रिया न करता राजरोसपणे बाहेर प्रवाहित करण्याच काम या कंपणीतुन होत असल्याची बाब “श्रीशिवशंभो युवा संघाच्या” निदर्शनास येताच,सामाजिक कार्यात आपल्या कार्याचा दबदबा निर्माण करणारी संघटना “श्रीशिवशंभो युवासंघ” आक्रमक झाल्याच पहावयास मिळाल अाहे.

         नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टिने धोकादायक असलेल्या प्रीव्हि कंपणीच्या गलथाण कारभाराची दखल घेत “श्रीशिवशंभो युवा संघाचे” पदाधिकारी आक्रमक होत प्रीव्ही कंपणीच्या गेटवर धडकले.श्रीशिवशंभो युवासंघाच्या प्रतिनिधींनी स्थानिक प्रिव्ही कंपणीतील प्रशासनाची भेट घेतली असता,आपण करित असलेल कृत्य हे गंभीर स्वरूपाचे असुन यामुळे नागरीकांच्या,पर्यावरणाच्या आणि रणरणत्या उन्हात पाण्याच्या शोधात भटकत असणार्या मुक्या प्राण्यांच्या जिवाशी खेळत असल्याची बाब निदर्शनास आणुन दिली.यावेळी स्थानिक कंपणी प्रशासनाच्या हालगर्जीपणाचा सर्वसामान्य नागरिकांना तसेच तेथे वावरणार्या पशु पक्षाना होत असलेल्या आणि भविष्यात उद्भवणार्या त्रासाचा पाढा “श्रीशिवशंभो युवासंघाच्या” प्रतिनिधींनी वाचला.कारखान्यालगतचा हा नाला साधारण १५० मिटरच्या अंतरावर असलेल्या कुंडलिका नदिस जोडला जातो.त्यामुळे हे घातक ररसायन नदिपात्रात जाऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहि.परंतु निर्ढावलेल्या स्थानिक कंपणी प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने न बघता दुर्लक्ष करित कोणतीच दखल घेतली नाहि.किंवा कोणतहि ठोस अाश्वासन “श्रीशिवशंभो युवासंघाच्या” प्रतिनिधीना दिल नाहि.यावेळी संतप्त “श्रीशिवशंभो युवासंघाच्या” प्रतिनिधीनी हि समस्या कंपणी प्रशासनाने लवकरात लवकर आटोक्यात आणावी असा निर्वाणीवजा ईशारा दिला.

         यावेळी “श्रीशिवशंभो युवासंघाचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष” सुशांत भोकटे म्हणाले कि,या घटनेकडे श्रीशिवशंभो युवासंघाने असे पहावे का कि,सदर कारखाना व्यवस्थापन मोकटपणे पर्यावरण व सामान्य नागरिकांची पर्वा न करता जल प्रदुषण करीत आहे? कारखाना प्रशासनावरती, कायद्याचा कोणता धाक राहिला नाही का?आम्हि संघटनेच्या माध्यमातुन कारखान्यावर जलप्रतिबंधक व प्रदुषण नियंत्रण अधिनियम १९४७ अन्वये कारवाई करावी अशा स्वरुपाचा मागणीचा पत्रव्यवहार संबधित विभागाकडे केलेला आहे.कारण नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा आणि पर्यावरणाची हानी करण्याचा अधिकार या कंपण्यांना कोणी दिला? असा संतप्त सवाल उपस्थित करीत.वरिष्ठ पातळीवरुन कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *