विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार आता अंतीम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी आघाडीची विजय निर्धार सभा आज कुंभोज येथे पार पडली.या सभेला खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे,अमल महाडिक, राजेंद्र पाटील यड्रावकर यंच प्रमुख उपस्थिती होती
आमदार विनय कोरे यांनी आपले मत व्यक्त करताना थोडक्यात आपल्या राजकीय जीवनाचा प्रवास सांगितला. राजकारणात चांगले वाईट दिवस येतच राहतात.निवडणुका येतात जातात पण नैतिकता एकदा गेली की गेली असे शब्दात त्यांनी सतेज पाटील यांना सुनावले.
सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधताना विनय कोरे म्हणाले, विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला होता. यावेळी बंटी पाटील यांची ही निवडणूक बिनविरोध झाल्यास आम्ही राजाराम कारखाना बिनविरोध करू असा शब्द मला दिला होता. परंतू सतेज पाटील आमदार झाल्यानंतर दिलेला शब्द विसरून गेले.
बंटी पाटील हे विश्वासघात करणारे आहेत….
यावेळी बोलताना विनय कोरे म्हणाले की भले बंटी पाटील यांनी शब्द विसरून गेले असतील पण मी मात्र महाडिकांना दिलेला शब्द पाळणार आहे. तसेच त्यांच्या सोबत वारणा परिवार, जनसुराज्य शक्ती पक्षाचा १००% पाठिंबा असणार आहे. असे वचन देखिल दिले. यावेळी राजाराम कारखान्याचे सभासद, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.