Share Now
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांनी पक्ष चिन्हाचा फोटो हटवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादीचा लोगो हटवल्याचं समोर आलं आहे. दरम्यान NCP चं नाव कायम ठेवलं आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी फेसबुकवरूनही चिन्हं हटवल्याचं दिसत आहे. फेसबुकवरही फक्त अजित पवार यांचा स्वत:चा फोटो आहे. त्यांच्या प्रोफाइलचा वॉलपेपरही हटवण्यात आल्याचं दिसत आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचं चिन्हं देखील हटवल्याचं दिसत आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगताना दिसत आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे बंद दाराआड चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे नेते सर्वकाही सुरळीत आणि चांगलं सुरु असल्याचं सांगत आहेत
Share Now