Share Now
Kolhapur – छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांनी टोप संभापुर, मौजे तासगांव येथे सभासद बंधू-भगिनींशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या पारदर्शी कारभार आणि सहकार टिकवून ठेवत सत्तारूढ आघाडीने गेल्या ३ दशकात कारखान्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यामुळे प्रचार सभांना आणि भेटींना सभासदांचा मिळणारा प्रतिसाद अगदी उत्साही आहे. ही उपस्थितीच सभासदांचा कारखान्यावर असलेला विश्वास व्यक्त करते आहे.
आपल्या विश्वासामुळेच आजपर्यंत आपण सहकार टिकवून ठेवण्यासाठी आणि कारखाना सभासदांच्या हक्काचा ठेवण्यासाठी आपण यशस्वी ठरलो आहोत. इथून पुढेही तुमच्या साथीनेच हे सहकाराचे पर्व आपल्याला टिकवायचे आहे. तेव्हा या निवडणुकीत आपण सर्वांनीच ‘कपबशी’ चिन्हावर शिक्का मारून ‘छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडी’ला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
Share Now