आर.टी.ई. २५ टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पडताळणी प्रक्रिया पुर्ण… RTE पोर्टलच्या होमपेजवर पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द…..!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 5 Second

कोल्हापूर : RTE पोर्टलच्या होमपेजवर लॉटरीद्वारे निश्चित झालेली पहिल्या प्रवेश फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी व पुढील प्रवेश फेऱ्यांसाठी प्रतिक्षा यादी दि.१२ एप्रिल २०२३ रोजी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामधील २५ टक्के कोटयातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या http://studentmaharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने हि प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गंत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ४५ शाळांमधील ५६० जागांसाठी एकूण १३२० अर्ज पालकांकडून प्राप्त झाले आहेत. या प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवार, दि.५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.४५ वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात आली. या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी दि.१३ ते २५ एप्रिल २०२३ असा आहे. मुदत वाढीबाबत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. प्रथम प्रवेश फेरीमध्ये निवडलेल्या पालकांच्या मोबाईलवर दि.१२ एप्रिल २०२३ रोजी दुपारनंतर शाळेच्या नावासह मेसेज पाठविण्यात आलेले आहेत. मात्र पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील Application wise Details अथवा SELECTED व WAITING LIST या टॅबवर जाऊन आपल्या फॉर्म नंबर द्वारे खात्री करुन घ्यावी. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी RTE पोर्टलवरील Allotment Letter सह महापालिकेच्या शिवाजी मार्केट ४ था मजला येथील प्राथमिक शिक्षण समितीच्या पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी दि.३० एप्रिल २०२३ पर्यंत संबंधित शाळेत जाऊन बालकाचा प्रवेश घ्यावा. विहीत कालावधीत शाळांमध्ये प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. ज्यांचे नाव WAITING LIST मध्ये असेल अशा अर्जांसाठी प्रवेशाची पुढील फेरी काढण्यात येईल. विद्यार्थी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती महाराष्ट्र शासनाच्या http://studentmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तरी पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतेही दलाल / संस्था यांच्या प्रलोभनांना बळी पडू नये. पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *