कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि. कसबा बावडा कोल्हापुर निवडणुक कालच पार पडली असुन. उद्या मंगळवारी निकाल जाहिर करण्यात येणार आहे.यावेळी मतमोजणी प्रक्रिया दरम्याण सत्तारुढ व विरोधी गट यांचे थांबण्याचे ठिकाण.पोलिस प्रशानस यांच्याकडून देण्यात आले आहे.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि. कसबा बावडा ता. करवीर जिल्हा कोल्हापुर यांची मतदान प्रक्रिया पार पडली असुन मोठ्या संख्येने सभासदांनी मतदान केले आहे. सत्ताधारी व विरोधी गटाचे कार्यकर्ते यांनी पोलीस प्रशासनास चांगले सहकार्य केले मुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे.
मंगळवार दिनांक २५-०४-२०२३ रोजी सकाळी ८ वाजल्या पासुन बहुउददेशीय हॉल रमणमळा कोल्हापुर येथे मतमोजनी प्रक्रिया पार पडणार आहे. सदर प्रक्रिया वेळी शांतता आबादीत राहणेसाठी सत्ताधारी (महाडीक गट) व विरोधी (पाटील गट) यांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबविणेत येणार आहे.
जिल्हाधीकारी कोल्हापुर यांनी कोल्हापुर जिल्ह्यामध्ये दिनांक १८ ते २९ एप्रिल पर्यंत जमाव बंदी आदेश लागु केलेला आहे. पोलीस अधिक्षक कोल्हापुर यांनी बंदी आदेशाचे उल्लंघन करु नये यासाठी नांगरीकांना आवाहन केले आहे.
सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहु सहकार आघाडी महादेवराव महाडीक समर्थक
थांबण्याचे ठिकाण—-
धोबी घाट, ड्रीमवर्ल्ड च्या बाजुस, रमणमळा
राजर्षी छत्रपती शाहु परिवर्तन आघाडी सतेज उर्फ बंटी पाटील समर्थक
थांबण्याचे ठिकाण—
१०० फुटी रोड, धान्य गोडऊन पिछाडीस, रमणमळा…