विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुक नुकतीच पार पडली. अत्यंत चुरशीने ९१% हून अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे सभासदांचा कौल पुन्हा एकदा सत्ताधारी महाडिक गटाकडेच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशी चर्चा नागरिकांमध्ये जोरदार सुरू आहे.
एक सहकारी संस्थेचे निवडणुक इतकी मोठी होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. पण सत्ताधारी महाडिक गट आणि विरोधी पाटील गट आमने सामने आल्याने निवडणुकीत वेगळेच चित्र तयार झाले. कोल्हापूरात महाडिक पाटील म्हणजे हे राजकारणातील पारंपरिक कट्टर विरोधक त्यामूळे लोकसभा, विधानसभा असो नहीतर महापालिका जिल्हापरिषद जिल्ह्यातील हे दोन नेते मैदानात आले तर ती निवडणुक प्रतिष्ठेची बनते.असेच चित्र राजाराम करखण्या देखिल पाहायला मिळाले.फक्त जिल्ह्यात नाहीतर तर संपूर्ण राज्यात चर्चेची ठरलेली हि निवडणुक आता निकालावर येऊन पोहचली आहे.
गेले तीन चार महिने सुरू असलेली तयारी,महिनाभर सुरू असलेल्या प्रचार सभा यामधून जिल्ह्याने एक वेगळा अनुभव घेतला. टीकेचे लक्ष्य वेधून सुरू झालेल्या सभा आणि एकमेकांवर केले गेलेले आरोप, जुन्या गोष्टींचा केले गेलेला खुलासा, आमने सामने येण्यास दिली गेलेली आव्हाने यामधून ही निवडणुक अत्यंत चुरशीची बनली गेली.
गेली २८ वर्ष सत्ताधारी महाडिक गटाने सहकार जपत कारखाना सांभाळला आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी सभासद पुन्हा त्यांच्याच हाती सत्ता देतील असे चित्र दिसत आहे.पण विरोधी पाटील गट देखिल तेवढ्याच ताकदीने निवडणुकीत उतराला होता. जिल्ह्यातील सभासदांच्या चर्चेतून सत्ता पुन्हा एकदा महाडिक गटाकडेच राहणार अशी शक्यता वर्तवली जातेय.उद्या सकाळी होणाऱ्या मतमोजणीत पूर्ण चित्र स्पष्ट होईल.
उद्या सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होईल.मतमोजणीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. उद्या दुपारपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होईल आणि सभासंदानी कोणाच्या हातात सत्ता दिली हे देखिल समजेल.