कळंबा तलावातील गाळ उपसा करून कळंबा तलावाची क्षमता वाढवा : राहूल चिकोडे …!

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 39 Second

कोल्हापूर : कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारा तलाव अशी ओळख कळंबा तलावाची आहे. कोल्हापूर शहरातील अनेक भागांना या तलावातील पाण्याचा उपयोग होतो. सध्या उन्हाळ्यामध्ये या तलावातील पाण्याच्या बाष्पीभवनामुळे कळंबा तलाव अटला, कोरडा पडला आहे. या परिस्थितीमध्ये कळंबा तलावातील गाळ उपसा करण्याची आवश्यकता आहे. गाळ उपसा केल्यामुळे तलावाची खोली तयार होऊन पाणी साठण्याची क्षमता वाढणार आहे.  

याविषयात आज निसर्गदूत फौंडेशनचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. निसर्गदूत फौंडेशनच्या वतीने निवेदन सादर करून लोक सहभागातून कळंबा तलावातील गाळ उपसा लवकरात लवकर सुरु करावा अशी मागणी करण्यात आली. अर्थमुव्हर्स असोसिएशन व अन्य सामाजीक संस्था यांना महानगरपालिकेच्यावतीने तलावातील गाळ काढण्याबाबतचे आवाहन करण्यात यावे यामध्ये पहिले दोन दिवस अर्थमुव्हर्सच्या मशीनरीसाठी लागणारे डीझेल आम्ही आमच्या निसर्गदूत संस्थेच्या वतीने देणार असल्याचे नमूद केले. आपण कोल्हापूर शहरातील तमाम जनतेला लोक सहभागातून याकार्यासाठी प्रवृत्त करून लवकरात लवकर कळंबा तलावातील गाळ काढण्यास सुरवात करावी व उपसा केलेला गाळ तलावाच्या आस-पासच्या शेतकऱ्यांना नेण्यासाठी विनंती, आवाहन करावे असे नमूद केले.

निसर्गदूत फौंडेशनच्यावतीने दिलेल्या निवेदनाला उत्तर देताना प्रशासकांनी याविषयात लवकरात लवकर प्रसिद्धी पत्रक जाहीर करून कळंबा तलावातील गाळ उपसा करू असे यावेळी शिष्ठमंडळाला सांगितले.  

यावेळी जयदीप मोरे, सचिन साळोखे, विजय आगरवाल, सुमित पाटील, प्रीतम यादव, सिद्धेश्वर पिसे, शंतनू मोहिते, सिद्धार्थ तोरस्कर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *