प्रतिष्ठेच्या लढाईत कोण मारणार बाजी….. राजाराम साठी चुरशीने ९१.१२% मतदान…..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 5 Second

कोल्हापूर : लक्षवेधी ठरलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज, रविवारी कार्यक्षेत्रातील ५८ केंद्रांवर चुरशीने सरासरी ९१.१२ टक्के मतदान झाले आहे. राजाराम कारखान्यामध्ये परिवर्तन घडवायचे या इराद्याने आमदार सतेज पाटील तर सतेज पाटील यांना रोखून सहकार टिकवायचा या इराद्याने माजी आमदार अमल महाडिक प्रयत्नशील असल्याचे पहावयास मिळाले. यामुळे आज झालेल्या मतदाना वरून दोन्ही बाजूंनी एक एक मतासाठी झालेली रस्सीखेच पहावयास मिळाली. तसेच मंगळवारी (दि. २५) सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.

 

राजाराम साखर कारखान्याचा उतारा, जिल्ह्याच्या इतर कारखान्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा उसाचा दर यावर बोट ठेवत विरोधी आघाडीने सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले. तर सत्ताधाऱ्यांनी डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे सभासद व एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे या निवडणुकीमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या यामुळे ही निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरली होती.

या निवडणुकीमध्ये २१ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत.. दोन्ही आघाड्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

आज मतदाना दिवशी सकाळ पासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी निवडणूक केंद्रावर मतदारांची भेट घेऊन पाहणी केली. तसेच माजी आमदार अमल महाडिक यांनीही मतदार केंद्रावर जाऊन पाहणी केली. दुपारपर्यंतच ८० टक्के मतदान झाले होते.

राजाराम कारखान्यासाठी एकूण ५८ मतदान केंद्रावरती मतदान घेण्यात आले. यामध्ये एकूण १३५३८ मतदारापैकी १२३३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९१.१२ टक्के मतदान झाले.

 

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कार्यक्षेत्रातील सर्व गावातील सभासदांनी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद परिवर्तन पॅनेल दिलेला आहे. गेले दोन महिन्याहून अधिक काळ या रणधुमाळीमध्ये जिल्ह्यातील सर्व सहकारी कार्यकर्ते, मिशन राजारामची टीम आणि अन्य सर्वांनी रात्रंदिवस या निवडणुकीसाठी कष्ट घेतले . सर्वांनी अगदी जीवाचे रान करून परिश्रम घेतले. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा, यासाठी काम केलेल्या हजारो हातांचे आणि सभासदांचे आमदार सतेज पाटील यांनी आभार मानले आहेत.

माजी आमदार अमल महाडिक यांनी सहकार टिकवण्याचा उद्देश आणि महाडिक यांच्यावर असलेल्या प्रेमाची भावना घेऊन या निवडणुकीसाठी रात्रंदिवस राबलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच सभासदांचे आभार मानले आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *