Share Now
Read Time:1 Minute, 17 Second
ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा ठिय्या आंदोलन..
ग्रामपंचायत हमिदवाडा ता. कागल येथे कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी एन, आर, मगदूम हे सतत गैरहर असतात त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे तसेच दप्तरी कामकाज ही अपूर्ण आहे त्याचा नाहक त्रास सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य बॉडीला होत आहे, वारंवार सुचना देऊनही ग्रामविकास अधिकारी यांच्यात कोणतीही सुधारणा दिसून येत नाही, त्यामूळे संबंधित ग्रामविकास अधिकारी यांची तत्काळ बदली करावी अन्यथा सरपंच उपसरपंच ,सदस्य व ग्रामस्थ यांच्याकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी सरपंच कृष्णात बुरटे, उपसरपंच उमेश डावरे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ , नरसिंह भोसले, प्रदीप वरपे आदी उपस्थित होते.
Share Now