संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचा ४९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय कोल्हापूर येथे दि. २ मे रोजी महामंडळाचा ४९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी अखिल महाराष्ट्र चर्मकार सेवा संघाचे स्थापक अध्यक्ष रघुनाथराव मोरे व जिल्हा अध्यक्ष विठ्ठल नांगरे यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 यावेळी रघुनाथ मोरे व विठठल नांगरे तसेच संतोष बिसुरे व भगवान रोटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास दामाजी रोटे, रमेश टोणपे, अजित हंकारे, दिपक खांडेकर, वसंत पोवार, रामचंद्र गडकर, लक्ष्मण चौधरी, संत रोहिदास विकास फौंडेशनचे पत्रकार युवराज मोरे तसेच विविध महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार यांनी महामंडळाकडे चालु असलेल्या योजनांची माहिती दिली व या योजना तळागाळात पोहचवण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *