दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराच्या नोटांबद्दल एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. २ हजाराच्या या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. परंतु या नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी देखील घाबरण्याचे कोणतेही कारण नाही आहे असे देखील सांगितले जात आहे. कारण आरबीआयने बाजारातून २००० रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या नोटा दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिक वापरू शकणार आहेत असं देखील आरबीआयने म्हटले आहेत. २०१८-१९ मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई ही थांबवण्यात आली होती. नागरिकांना २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी हा देण्यात आला आहे
सध्या या नोटा व्यवहारात असणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आता दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या नोटा परत घेणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ३० सप्टेंबपर्यंत २ हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या २००० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबर अशी मुदत दिली आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून या २ हजाराच्या नोटा बंद होतील, अशा जोरदार चर्चा सुरु होत्या. तसेच सोशल मीडियावर देखील या बाबत वारंवार चर्चा केल्या जात होत्या. पर्णातू आज अखेर रिझर्व्ह बँक ने या बाबत आदेश दिला आहे. तसेच या नोटा बदलत असताना एकावेळी फक्त २ हजार रुपयांच्या नोटा २० हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे