कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीसाठी आज मतदान…

विशेष वृत्त प्रमोद माजगावकर 

(कोल्हापूर) – येथील कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीसाठी आज मतदान होत आहे. 

Advertisements

एकूण अकरा जागांसाठी तेवीस उमेदवार रिंगणात असून चुरशीने मतदान होत आहे. बापट कॅम्प येथील कुंभार सोसायटी हॉलमध्ये सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होत असून आजच सायंकाळी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. 

संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार सत्तारूढ युवाशक्ती आघाडीतून अभिजीत कुंभार, महेंद्र कुंभार, आशिष पाडळकर, शांताराम माजगांवकर, चंद्रकांत कुंभार, शिवाजी कुंभार, एकनाथ माजगावकर, राकेश वडणगेकर यांच्यासह इतर मागास प्रवर्गातून विजय पुरेकर, महिला गटातून उज्वला ब्रम्हपुरे, सुरेखा माजगावकर यांचा समावेश आहे. इतर मागास प्रवर्गातून सोपान वडगावकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

माजी उपमहापौर अरूण निगवेकर, प्रकाश सरवडेकर, संजय निगवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत शिरोमणी गोरोबाकाका परिवर्तन पॅनेल रिंगणात आहे.

    या आघाडीत विद्यमान संचालक सर्जेराव निगवेकर, रमेश पुरेकर, महेश कुंभार- वडणगेकर, राजेंद्र थोरावडे, भरत साळवी, निखिल पाडळकर, रविराज माजगावकर, अमर पुरेकर यांच्यासह इतर मागास प्रवर्गातून प्रकाश सरवडेकर, महिला गटातून उषा बावडेकर, दीपाली माजगावकर यांचा समावेश आहे.

  1.           निवडणूक अधिकारी म्हणून विजय मारुती तोडकर कामकाज पाहत आहेत तसेच उपनिबंधक प्रदीप मालेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान अत्यंत चुरशीने सुरू असून दुपारी 12 पर्यंत 44 टक्के मतदान झाले असून 1 हजार 20 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीला कोल्हापूर शहरातील कुंभार समाजाचे लक्ष लागून राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *