वंचित उपेक्षित गरिबांचे “आधारवड” सामाजिक कार्यकर्ते आजम जमादार यांना रोटरी तर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले…..

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 47 Second

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क

 

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स, तर्फे २०२३ या वर्षा साठीचे ‘ सामाजिक, व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’ २० मे रोजी प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सहाय्यक प्रांतपाल रो. सुजाता लोहिया व प्रांतपालांचे विशेष प्रतिनिधी रो वारणा वडगावकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

सुजाता लोहिया यांनी रोटरीची सविस्तर माहिती दिली व सर्व गौरव मूर्ती हे कौतुकाचे पात्र असल्याची सांगितले.

प्रमुख पाहुण्या वारणा वडगावकर म्हणाल्या की आपापल्या परीने सामाजिक कार्य करणाऱ्या दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहचणे व त्यांचे काम समाजापर्यंत पोहोचवणे हे रोटरी चे काम असल्याचे सांगितले.

 

विषेशतः वंचित उपेक्षित गरिबांचे “आधारवड” सामाजिक कार्यकर्ते आजम जमादार यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरी क्लब कोल्हापूर यांच्या कडून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

रॉयल्सच्या अध्यक्षा सविता पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व अशा पुरस्कारांमुळे सामान्य माणसाला अधिक बळ येतं असे सांगितले.

आभार मनीषा राठोड यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅनीस नोरेन्ज यांनी केले. यावेळी प्रिया बासरानी, जया शिंदे, प्रेमा चौगले, स्मिता सावंत मांडरे, विद्या साळोखे, सुषमा धर्माधिकारी, सत्कारमूर्ती व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

पुरस्कार विजेते खालील प्रमाणे डॉ लता पाटील (शैक्षणिक क्षेत्र), अनिता काळे (सामाजिक कार्य), मंगला जाधव (घरगुती काम), शिवाजी आळवणे (शेतकरी), सौम्या तिरोडकर( विमा सल्लागार), डॉ शशिकांत कुंभार (आयुर्वेदाचार्य), डॉ. सुषमा सिद ( आयुर्वेदाचार्य), आजम जमादार ( सामाजिक कार्य ), कार नवळी हळकर ( आपत्ती व्यवस्थापन), चिदंबर शिंदे (ग्राफिक डिझाईनर), डॉ मनाली बाफना ( डॉक्टर ), दिपक बिडकर ( नृत्य विशारद), अभिलाषा नाईक (व्यवसायिक शिक्षण)

रोटरी गौरव पुरस्कार वेदिका जाधव (स्पोर्टस), श्रेया देसाई (मुलांचा लैंगिक छळ विरोधी संघटना ‘सक्षम’), व दिपक जाधव (सामाजिक कार्य) यांना तर नेशन बिल्डर अवॉर्ड हारकानाथ भोसले (विद्यामंदिर हुपरी), सुजाता पाटील (प्रबुद्ध भारत हायस्कूल) व अशोक चौगुले ( न्यू कॉलेज) यांना वितरित करण्यात आले. तसेच मनोज गुणे, विनय कौलवकर, पंकज इंगळे, गार्गी दाभाडे, सोनाली चिपाडे व तत्त्व लुनिया यांना फ्रेंड ऑफ रोटरी पुरस्कार देण्या आला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *