Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर(अमर खोत) : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने मंगळवार दि. २३ रोजी सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या ऑडिओ-व्हिज्युअल प्रोग्रॅम विभागाचे प्रमुख मिथुनचंद्र चौधरी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेली चौधरी यांच्या चौदा मिनिटांच्या ‘पायवाट’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षापासून ‘सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फोटोग्राफी’ आणि ‘सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग’ हे दोन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. या अभ्यासक्रमाचा शुभारंभ चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विद्यार्थी तसेच चित्रपट क्षेत्राशी संबंधित संशोधक, अभ्यासकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.
चौधरी यांनी पुणे, मुंबई, नगर, गोवा आदि ठिकाणच्या विविध शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक ते विभाग प्रमुख आदी विविध पदांवर काम केलेले आहे. २००६ पासून ते शॉर्ट फिल्म आणि फिल्म निर्मितीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या अनेक शॉर्ट फिल्मला विविध महोत्सवामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नागराज मंजुळे यांच्या ‘फॅन्ड्री’ चित्रपटात त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. शिवाय मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामध्ये त्यांनी मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह विविध चित्रपट महोत्सवांमध्ये चौधरी जुरी म्हणून काम करतात. चौधरी यांचा फिल्म, डॉक्युमेंटरी, स्क्रिप्ट रायटिंग आदि क्षेत्रातील अनुभव मोठा असल्याने या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.