Kolhapur : कोल्हापूरातील ट्रॅफिक ऑफिसजवळ एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती.त्या व्यक्तीला उपचारासाठी सी पी आर येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मयत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून बुधवार दिनांक १९ एप्रिल रोजी शहरातील ट्रॅफिक ऑफिस जवळील जैन बोर्डिंग शेजारी सदर व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्याचे नाव बेबो नासा असे सांगण्यात आले पण तो राहतो कुठे याचा पत्ता माहित नसल्याने पोलिसांकडून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरु आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे मृत व्यक्तीची नोंद झाली असून नातेवाईकांच्या शोध लवकर लागण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस.कोळेकर यांनी प्रसार माध्यमांना सदर माहिती प्रसिद्धीसाठी दिली आहे.
ह्या वर्णनाच्या व्यक्तीची ओळख पटल्यास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील पोलीस उप निरीक्षक यांचेकडून करण्यात आले आहे.