Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : राजर्षी शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबाॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात कोल्हापूरातील शिवाजी तरूण मंडळ विरुद्ध केरळ इलेक्ट्रिसिटी फुटबॉल क्लब एकमेकांसमोर तगडे आव्हान घेऊन उभे आहेत. कोण जिंकणार चांदीचा मानाचा चषक कोण होणार शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचा विजेता याची संपूर्ण जिल्ह्याला उत्सुकता लागून राहिली आहे.
आजपर्यंत कोल्हापुरातील स्थानिक संघाला या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. केरळ पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झाली आहे. केरळ शाहू गोल्ड चषकाची परंपरा कायम ठेवणार की शिवाजी तरूण मंडळ इतिहास बदलणार याकडे अवघ्या क्रीडाप्रेमिंचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवाजी तरूण मंडळ ने वाघाची तालीम, फुलेवाडी यांच्यासह मोहामेडन सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्यांना बालगोपालचे तगडे आव्हान होते. बालगोपाल तालीमचा पराभव करून शिवाजी तरूण मंडळ ने अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झालेल्या KSEB केरळ संघासाठी पहील्याच सामन्यात बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळाचे तगडे आव्हान होते. परंतु पाटाकडील कडून अपेक्षित खेळाचे प्रदर्शन न झाल्याने केरळ ने ४-० अशा मोठ्या गोल फरकाने त्यांना पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्यांना जुना बुधवार पेठ सोबत सामना खेळायचा होता. सर्व कोल्हापूरकरांना अपेक्षा होती की केरळ सहज बुधवार पेठ वर विजय प्राप्त करेल.परंतु बुधवार पेठ कडून उपांत्य फेरीत जबरदस्त खेळाचे प्रदर्शन झाले. त्यांनी शेवटपर्यंत केरळला विजयसाठी झुंजवले. शेवटी ट्रायब्रेकर मध्ये विजय मिळवत केरळ अंतिम फेरीत दाखल झाली.
आजच्या अंतिम सामन्यात शिवाजी तरूण मंडळ विजयाचा दावेदार मानली जात आहे. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिकेत जाधव, निखिल कदम, राष्ट्रिय खेळाडू संकेत साळोखे सह कोल्हापूरातील कारण बंदरे, योगेश कदम विशाल पाटील गोलकीपर मयुरेश चौगुले अशी भक्कम टीम आहे. तर केरळ कडून स्टार खेळाडू विक्नेश एम. करून बेबी, गिल्बर्ट, मोहम्मद परकोट्टील, गिफ्टी सलीम असे राष्ट्रिय खेळाडू आहेत. यामुळे केरळ संघाला देखिल विजयाचे दावेदार मानले जात आहे. आजचा सामना अत्यंत चुरशीची आणि ऐतिहासिक होणार याची कोल्हापुरसह संपूर्ण फुटबॉल प्रेमींनी खात्री आहे.
आजच्या अंतिम सामन्यात शाहू स्टेडियम पुर्णपने भरून जाणार आहे. स्थानिक संघाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केरळ संघासाठी चिअरअप करण्यासाठी अवघे कोल्हापुर तयार आहे. या ऐतहासिक मॅचचे साक्षीदार होण्यासाठी नक्की मैदानावर यावे.