UPSC मध्ये इशिता किशोर देशात तर ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात प्रथम….!

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 13 Second

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने यु.पी.एस.सी नागरी सेवा २०२२ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. या परीक्षेत इशिता किशोरने ऑल इंडिया प्रथम रँक प्राप्त केली आहे. तिच्या पाठोपाठ दुसऱ्या रँकवर गरिमा लोहिया, तिसऱ्या स्थानी उमा हर्थी एन आणि स्मृती मिश्रा यांचा नंबर लागतो. आजच्या निकालात महाराष्ट्रात ठाण्याची कश्मिरा संखे हिने प्रथम क्रमांक मिळवला तर रीचा कुलकर्णी हिने दुसरा क्रमांक मिळवला आहे.

आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती.

यामध्ये इशिता किशोर देशात पहिली तर ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली आली आहे. यंदाच्या यूपीएससी निकालात मराठी मुलांचा मुलींचा दबदबा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या निकालात वसंत दाभोळकरने ७६ वा क्रमांक, प्रतिक जराड १२२ वा क्रमांक, जान्हवी साठे १२७ वा क्रमांक, गौरव कायंदे-पाटील १४६ वा क्रमांक तर ऋषिकेश शिंदे १८३ वा क्रमांक, अमर राऊत २७७ वा क्रमांक, अभिषेक दुधाळ २७८ वा क्रमांक, श्रुतिषा पाताडे २८१ वा क्रमांक, स्वप्नील पवारने २८७ वा क्रमांक, अनिकेत हिरडेने ३४९ वा क्रमांक पटकावला आहे.

 

UPSC मधील यावर्षीचे निवडले गेलेले टॉप १० उमेदवार…

१) इशिता किशोर

२) गरिमा लोहिया

३) उमा हरति एन

४) स्मृति मिश्रा

५) मयूर हजारिका

६) गहना नव्या जेम्स

७) वसीम अहमद

८) अनिरुद्ध यादव

९) कनिका गोयल

१०) राहुल श्रीवास्तव

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *