गरिबांच्या झोपडीत जमिनीवर बसून त्यांच्यासोबत भाजी – भाकरी खाणारे यशवंत दादा यांच्यासारखे व्यक्तिमत्व आजच्या राजकारणात दुर्मिळ झाले आहे. : प्राचार्य विश्वनाथ पाटील 

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 51 Second

कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) : माजी आमदार ( कै.) यशवंत एकनाथ पाटील (दादा) यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील आणि त्यांचे सहकारी.

– – – प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांची खंत 

कोल्हापूर:कोणताही राजकिय वारसा नसलेल्या एका शेतकरी कुटुंबात यशवंत दादा यांचा जन्म झाला. कोडोली ग्रामपंचायत सदस्य, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ते आमदार व शिक्षण संकुलाचे संस्थापक या प्रवासात त्यांची गोरगरिबां शी असलेली नाळ कधीच तुटली नाही. पन्हाळा – गगन बावडा – वैभव वाडी एव्हढ्या मोठ्या मतदार संघाचे वा र णा परिसरातून त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. मतदारसंघातील डोंगरी व कोकण भागातील गोरगरीब जनतेशी त्यांचे घरगुती ऋणानुबंध निर्माण झाले होते. गरिबांच्या झोपडीत जमिनीवर बसून त्यांच्यासोबत भाजी – भाकरी खाणारा नेता आजच्या राजकारणात दुर्मिळ झाला आहे, ” अशी खंत येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केली.

      येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि ‘वा र णे चा वाघ’ अशी ख्याती असलेले माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील ( दादा) यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त ते बोलत होते.

    (कै.) यशवंत एकनाथ पाटील यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. श्रीमती जी. के. मुजावर आणि कार्यालयीन अधीक्षक श्री. एस. के. पाटील यांनी त्यांच्या भाषणातून दादांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. यावेळी प्रा. एस. डी. र क्ता डे, प्रा. संजय जाधव, वरीष्ठ लिपिक अनिल इंदुलकर व तानाजी मोहिते आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *