अजय शिंगे
कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे ७ हून अधिक टँकर घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले जात आहेत.रहदारीच्या रस्त्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी अचानक आग लागल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली आहे. आजूबाजूला असणाऱ्या दुकानांना आणि घरांना देखिल आग लागण्याची आहे त्यामूळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहेत.
घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका दुकानाला सायंकाळी अचानक आग लागली.आगीचे प्रमाण एवढे जास्त होते की परिसरात मोठा धुरांचा लोट बाहेर पडू लागला. लोकवस्तीत आणि गर्दीच्या ठिकाणी अचानक लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग मोठ्या प्रमाणत पसरत होती. त्यामूळे जवळ जवळ ७ हून अधिक बंब घटनास्थळी पोहोचले असून आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आग नक्की कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.