रायगड दुर्घटना : अन् काही क्षणातच आख्ख गावं मातीखाली दबले गेले..

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 30 Second

रायगड प्रतिनीधी : सध्या कोकण सह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे.
राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असुन रायगड जिल्ह्यालाही जोरदार पावसाने झोडपले आहे. रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
दरडीखाली 40 हून अधिक घरं दबल्याचा व अनेक जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा आदिवासी पाडा असून येथे आतापर्यंत 50 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे सर्वांचे जनजीवन हे विस्कळीत झाला असून आतापर्यंत 25 जणांना बाहेर काढण्यात यश आले असुन एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळगड इथं दाखल झाले आहेत तेथील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेत आहेत हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन केलं केले जाणार आहे. तशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे.

काल रात्री 10 ते 11 च्या दरम्यान ही दुर्देवी घटना घडली. खालापूरच्या इर्शालगडावरील चौक गावापासून ६ किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासींची वाडी आहे. या वाडीवर रात्री दरड कोसळली. या गावात 40 घरे आहेत. ही सर्व घरे दरडीखाली आली आहेत. रात्री गावातील लोक झोपेत असतानाच ही दरड कोसळली. त्यामुळे 60 ते 70 जण दरडीखाली दबल्या गेली. ही घटना घडताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. तसेच अग्निशमन दल आणि पोलिसांना तात्काळ पाचारण करण्यात आलं. एनडीआरएफची टीमही घटनास्थळी धाव घेतली
घटनास्थळी जात असतानाच एका NDRF दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इर्शालगडावर सहा किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. दोन किलोमीटरचा हा ट्रेक आहे. डोंगर चढत जात असताना NDRF दलाच्या एका जवानाला धाप लागली. त्यानंतर वाडीवरील दृश्य पाहून एका NDRF जवानाला हृदयविकाराचा झटका आला. त्यात या जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. इतर जवानांनी या जवानाला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी या जवानाला मृत घोषित केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *