दिपेश बांदल-रोहा प्रतिनीधी :- पावसाच्या प्रतिक्षेत असलेलल्या नागरिकांना या महिन्यात मात्र अक्षरक्ष: झोडपुन काढले आहे.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असुन काही ठिकाणी पुरजन्य परिस्तिथी निर्माण झाल्याच चित्र आहे.आज दिनांक १९ जुलै पावसांच रौद्ररुप पाहता अनेक ठिकाणच्या जनजीवन विस्कळीत झाले असून शाळेना सुट्टि दिलेली आहे.
अशातच रोहा येथील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडु नका असा आदेश प्रशासनमार्फत देण्यात आला आहे.रोहा कुंडलिका नदीने केले रौद्ररुप धारण केल असुन आजूबाजूच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दिनांक १९ जुलै २०२३ बुधवार,
सतत दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने अगदी कोकणात थैमान घालून ठेवलं आहे ,नागरिकांना जीव मुठीत घेऊन कामावर जावं लागत आहे त्यात कुंडकीला नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे नागोठणे अलिबाग जाणारे मार्ग बंद केले आहेत. रायगड जिल्हा पाणी पातळी अहवाल ,कुंडलिका नदी रोहा इशारा पातळी मी. २३.०० मी . तसेच धोका पातळी मी. २३.९५ मी इतकी असून सध्या पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे सध्याची पाणी पातळी २३.७५ मी इतकी झाली आहे त्यामुळे अनेक गावांचे संपर्क तुटले असून, रायगड जिल्ह्यातील शाळा कॉलेज ला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे .
आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केलं आहे तरी कोणीही जीव मुठीत घेऊन घरातून बाहेर पडू नये.
रोहा अष्टमी पुलावरून पाणी जात असल्यामुळे बाजारपेठ नजीकच्या सर्व व्यापाऱ्यांची काही नुकसान होऊ नये म्हणून दक्षतेसाठी काळजीपूर्वक अमलबवणी केली असून.तरीही कोणीही महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये . असे प्रशासनाने कळवले आहे.