जी.एस.टी.भवन कोल्हापूर येथील घरफोडीची शाहूपुरी पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाला २४ तासात उघडकीस अनण्यात यश..

जावेद देवडी दि.18 : जी.एस.टी.भवन ताराबाई पार्क कोल्हापूर येथील घरफोडी शाहूपुरी पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून २४ तासात उघड 

जी.एस.टी.भवन ताराबाई पार्क कोल्हापूर येथे मुद्देमाल चोरीस गेलेला होता. त्याबाबत जी.एस.टी. भवन ताराबाई पार्क कोल्हापूर कार्यालय कडील रवींद्र अरुण पाटील रा. मंगळवार पेठ कोल्हापूर यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे घरफोडीचा दिनांक १७/०७/२०२३ रोजी तक्रार दिला होता.

Advertisements

सदर घरफोडीच्या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखा तपास करत असताना शाखेतील अंमलदार शुभम संकपाळ व लखन पाटील यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की जी.एस.टी. भवन ताराबाई पार्क कोल्हापूर येथे झालेल्या घरफोडीतील चोरीस गेलेला माल विक्री करण्यासाठी दोन इसम मेरी वेदर मैदान नागाळा पार्क येथे येणार आहेत. 

त्याप्रमाणे शाहूपुरी पोलीस यांनी मेरी बेदर मैदान नागाळा पार्क येथे सापळा रचून  वरील दोन आरोपींना शिताफीने अटक केली. त्याना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली.

त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी आपली नावे १) हरेराम दशरथ विश्वकर्मा व व. २५ रा. ग्राम बरांगा पोस्ट सायदराजा जिल्हा चंदोली उत्तरप्रदेश २) गुलशन साहू व.व. २४ रा. ठाकूर दिया ठाण बिलाईगड जिल्हा बुलावदा बाजार भाटापारा छतीसगड अशी सांगितली. त्याना त्याच्याजवळ असलेल्या पोत्याबाबत विचारले असता त्यांनी पोत्यात असलेली बंडले ही त्यांनी जी.एस.टी. भवन ताराबाई पार्क कोल्हापूर येथून चोरी केल्याची कबुली दिली. 

त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल त्यांनी लक्ष्मीपुरी येथील भंगार व्यावसायिकाला विकल्याचे सांगितले प्रमाणे सर्व मुद्देमाल २४ बंडल एकूण किंमत १,३४,७५४/- जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई – पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार संदीप जाधव अंमलदार मिलिंद बांगर, लखन पाटील, शुभम संकपाळ, बाबा ढाकणे, विकास चौगले, रवी आंबेकर.. यांनी केली. पुढील तपास पोलीस नाईक वैभव अतिग्रे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *