Share Now
हॉकी प्रेमी एस. जे. फाउंडेशनचे प्रमुख व
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे इन्चार्ज मा.संदीप जाधव यांची युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या शिष्ट मंडळाने सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजी शिंगे, राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी, राज्य सरचिटणीस अजय शिंगे, राज्य संघटक नियाज जमादार, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शरद माळी, जेष्ठ पत्रकार नंदकुमार तेली प्रमुख उपस्थित होते.
शुभेच्छा स्वीकारताना संदीप जाधव म्हणाले पोलीस सेवेमध्ये आजपर्यंतच्या प्रवासात वरिष्ठांचा आदर ठेवून प्रामाणिक काम करत असताना अनेक मित्र मी कमावले आहे पुन्हा एकदा शाहूपुरी ठाण्यामध्ये सेवा करायला संधी मिळाल्याबद्दल मी आनंदी उत्साही आहे युवा पत्रकार संघाने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.
Share Now