कोल्हापुरात अडकलेले बाहेर गावचे कलाकार व गरजूंना धनंजय महाडिक युवाशक्ती तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 34 Second

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोणत्याही आपत्तीच्या काळात कोल्हापुरकरांच्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणार्‍या धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने याही आपत्तीत मदतीचा यज्ञ सुरू करण्यात आलाय. पुण्या-मुंबईवरून कामासाठी कोल्हापुरात आलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कुटुंबांना युवाशक्तीच्या वतीने अन्नधान्याचे किट देण्यात आले. तसंच रजपुतवाडी येथेही अनेक गरजू कुटुंबांना किट वाटप करून, दिलासा देण्यात आला.
धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने प्रत्येक आपत्ती काळात नागरिकांसाठी मदतीचा उपक्रम राबवला जातो. मोठया प्रमाणात मदतीचे वाटप करून, गोरगरीब, गरजू लोकांना आधार आणि पाठबळ देण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून युवाशक्ती मार्फत सुरू आहे. संचारबंदी लागू झाल्यानंतर अनेक कष्टकरी आणि मजूर कुटुंबांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. रोजचे उत्पन्नाचे साधनच बंद झाल्यामुळे काय खायचे या विवंचनेत अनेक कुटुंब आहेत. अशा कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके रेशन आणि जीवनावश्यक वस्तू देण्याचे काम धनंजय महाडिक युवाशक्ती करत आहे. आजही दोन ठिकाणी मदतीचा उपक्रम राबवण्यात आला. आमदार अमल महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मदतीचा उपक्रम आज घेण्यात आला. पुण्या-मुंबईवरून सुमारे दिडशे कलाकार कामानिमित्त कोल्हापुरात येवून राहीले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अशा कुटुंबांना आज युवाशक्तीच्या वतीने रेशन धान्याचे किट प्रदान करण्यात आले. सुमारे दिडशे किट यावेळी देण्यात आली. पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते आणि नगरसेवक शेखर कुसाळे, पप्पू रजपुत, मुकुंद सुतार, रवी सुतार, मेघराज सुतार यांच्या उपस्थितीत ही किट प्रदान करण्यात आली. दरम्यान रजपुतवाडी येथे अनेक कष्टकरी, गरजू, भटके आणि हातावरचे पोट असणार्‍या कुटुंबांना जेवण आणि रेशन देण्यात आले. महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य परिसरातील शेकडो कुटुंबांना देण्यात आले. गरजूंच्या मदतीसाठी लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे पृथ्वीराज महाडिक यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जीवनसिंग रजपुत, सरपंच आक्काताई कुंभार, उपसरपंच बाजीराव मस्कर, परशराम बैलकर, जीवन चव्हाण, तानाजी गोसावी, रामचंद्र गोसावी, परशराम गोसावी, संदीप गोसावी, सखाराम गोसावी, उमेश गोसावी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *