कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : करवीर तालुक्यातील चिंचवाड येथील कल्पतरू कॉलनीच्या वतीने झालेल्या शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच सुदर्शन उपाध्ये, उपसरपंच बाबुराव कोळी, पोलिसपाटील रवी कांबळे आदीसह कॉलनीतील नागरिक उपस्थित होते. राज्य रक्तसंकलन परिषदेच्या नियमाचे पालन करून शिबिर घेण्यात आले. शाहू ब्लड बँक कोल्हापूर , चिंचवाड ग्रामपंचायत, गांधीनगर पोलिस ठाणे यांचे शिबिरासाठी सहकार्य लाभले.
चिंचवाडमध्ये रक्तदान शिबिर
