कोल्हापूर : जावेद देवडी
श्रीराम सोसायटी हॉल कसबा बावडा कोल्हापूर येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहूपुरी पोलीस ठाण्यातर्फे गणेश सण उत्सव निमित्त कसबा बावडा परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये स्थानिक आजी माझी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते गणेश तरुण मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मीटिंग मध्ये आगामी गणेश उत्सव 2023 शांततेत मोठ्या उत्साहाने साजरा होण्यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले,
सदर मार्गदर्शन मध्ये सुरक्षितता आणि शासनाने घालून दिलेले नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे कोणत्याही समाजाच्या व्यक्तीच्या भावना दुखावतील असा कोणताही देखावा अथवा सजीव देखावा सामाजिक भावना दुखावतील असे आयोजित करू नये,
रीतसर सर्व परवानगी घेऊन सण उत्सव साजरा करावा तसेच
देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्या ठिकाणी महिला वर्ग व पुरुष वर्ग यांची वेगवेगळी व्यवस्था करावी
गर्दी वर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत महिलांची मुलींची व वयोवृद्धांची छेडछाड होणार नाही त्यासाठी जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमावेत मंडपामध्ये 24 तास भटक्या प्राण्यापासून जनावरापासून व समाजकंटकाकडून मूर्तीची विटंबना होणार नाही यासाठी जबाबदारी स्वयंसेवक नेमावेत तसे काही घटना निदर्शनास आल्यास 112 नंबर वर ताबडतोब आम्हाला कळविण्यात यावे,
माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ध्वनी प्रदूषणाबाबत नियमाचे काटेकोरपणे पालन करावे विद्युत प्रवाह सुरक्षित असावा इत्यादी सूचना करण्यात आल्या.
बैठकीसाठी मनपा प्रशासन एम एस ई बी प्रशासन पीडब्ल्यूडी (महसुल) प्रशासन यांना बोलवण्यात आले होते सदर प्रशासन अधिकारी यांनी मंडळांना व उपस्थितीत यांना मार्गदर्शन केले.
सदर बैठकी करता मोठ्या संख्येने कसबा बावडा परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
शाहूपुरी पोलीस ठाणे त्यांच्याकडून प्रास्ताविक व आभार मानण्यात आले.