विशेष वृत: जावेद देवडी
कोल्हापूर – राष्ट्रीय समाज पक्षाच्या कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार सुशांत पोवार यांची नेमणूक करण्यात आली तर सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदी सिमंतिनी मयेकर यांची निवड करन्यात आली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर वरक यांच्या मार्गदर्शनाखाली यांना नियुक्ती पत्र देऊन पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
सुशांत पोवार यांनी आत्तापर्यंत पत्रकारितेतून अनेक उपेक्षित वंचितांना न्याय मिळवून दिला आहे व सामाजिक राजकीय क्षेत्रात काम केल्यामुळे त्यांना विविध क्षेत्रातील अनुभव आहे. त्यांनी आज पर्यंत पत्रकारितेतून महाराष्ट्रातील ज्वलंत विषय जैव वैद्यकीय कचरा संकलन व निर्मूलन विषयात सडेतोड निर्भिड लिखाण करून अलिकडच्या अधिवेशनात महाराष्ट्र शासनास कारवाईस भाग पाडले, त्यांच्या 17 वर्षाचा अनुभवाचा व उल्लेखनीय कार्याचा पक्षवाढीसाठी फायदा होणार आहे. तसेच सुशांत पोवार यांचा पत्रकारितेतून सर्व शासकीय अधिकारी तसेच कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये मोठा संपर्क असल्याने त्याचा फायदा पक्ष वाढीसाठी होणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, युवा पत्रकार संघाचे पदाधिकारी हितचिंतक तसेच विविध शासकीय अधिकारी व कोल्हापूर – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी अभिनंदन करुन भावी कार्याला शुभेच्छा दिल्या
यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.