रोटरी मोव्हमेन्ट तर्फे १०००लि.शुद्ध जल मशिन चे उद्घाटन सोहळा..
कोल्हापूर- रोटरी मोव्हमेन्ट कोल्हापूर २०२२-२३ यांच्या वतीने व कपिलतीर्थ भाजी मार्केट व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने १००० लि. रोटरी शुद्ध जल या मशीन चे उद्घाटन माझी प्रांतपाल व्यंकटेश (बबन) देशपांडे(२०२२-२३) तसेच प्रांतपाल नासिर बोरसदवाला यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. यासाठी कोल्हापुरातील १५ रोटरी क्लबचे माझी अध्यक्ष व सेक्रटरी उपस्थित होते. पिण्या योग्य पाणी सर्वाना मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. समाजासाठी जल मिळालेच पाहिजे व ते शुद्ध असावे अशी संकल्पना मागच्या वर्षी रोटरीने राबविली होती. या संकल्पनेच्या आधारे रोटरी मोव्हमेन्ट तर्फे कपिलतीर्थ भाजी मार्केट मध्ये १०००लि. शुद्ध जल मशिन चे उद्घाटन करण्यात आले. या शुद्ध जल मशीनचा समाजातील सर्व नागरिक व कपिलतीर्थ भाजी मार्केट मधील दुकानदार यांना लाभ होणार आहे. या साठी अनेक लोकांची उपस्थिती होती त्यामध्ये कपिलतीर्थ मार्केट चे अध्यक्ष किरण तसेच रोटरी मोव्हमेन्ट चे अध्यक्ष संजय साळुंखे ,सेक्रटरी डॉ . भूषण शेंडगे,खजिनदार श्री बळीराम वराडे व असिस्टंट प्रांतपाल प्रवीण कुंभोजकर,अनिरुद्ध तगारे,अध्यक्ष ऋषिकेश खोत, अध्यक्ष सचिन बेनाडी,अध्यक्ष सविता पाटील, अध्यक्ष प्रा .राजेंद्र पोंडे ,अध्यक्ष उदय पाटील तसेच सेक्रटरी अभिजीत पिपंळकर ,सागर बकरे,किरण पोवार,स्वप्नील कामत ,संजय संकपाळ,सिनियर रोटरियन कडोलकर, पानस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.