Getting your Trinity Audio player ready...
|
मिडिया कंट्रोल न्युज
सांगली जोरदार पावसामुळे सिझनल व्यवसाय करणाऱ्या गोरगरीब व्यवसायिकांचे भरपूर नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण ?
डॉ. आंबेडकर स्टेडियम मध्ये व्यवसायांना दिलेली जागा ही चुकीच्या पद्धतीने पेंडाल मारून पूर्णता पावसाच्या पाण्यात व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासकाकडून अन्याय,
नेहमीच्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या अनेक छोटे-मोठे व्यवसाय धारक व्यवसाय करताना त्यांची सांगली महानगरपालिकेच्या प्रशासकाकडून उठाव करून तात्पुरत्या स्वरूपात स्टेडियम मध्ये व्यवसाय करण्यास भाग पाडले.
मात्र आज अचानक जोरदार पाऊस होऊन अवघ्या दोनच दिवसावर येऊन ठेपलेल्या मुख्य सण दिपावलीच्या सणानिमित्त प्रचंड प्रमाणात भरलेल्या व्यवसायाचे माल पूर्णता पाण्यात बुडून मोठे नुकसान झाले आहे.
या कारणास्तव सर्व व्यवसायिकांच्या कडून प्रशासनाने याची जबाबदारी घेऊन सर्वच व्यवसायिकांना नुकसानभरपाई द्यावी अशा मागणीला जोर धरत आहे.
आयुक्त व महानगरपालिकेचे ढिसाळ नियोजनाचे उदाहरण दोन दिवसावर दिवाळी सण असताना झालेली नुकसानामुळे व्यवसायिकांच्या अश्रू अनावर झाले.