मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण सभेत कोल्हापुरातील नामवंत डॉक्टर यांनी पाठींबा देत मोफत आरोग्य तपासणीची या ठिकाणी केली सोय.

कोल्हापूर, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण विराट सभेमध्ये डॉक्टर संदीप पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापूर कॅन्सर सेंटर, सिद्धिविनायक हॉस्पिटल, अंतरंग हाॅस्पीटल, साई कार्डियाक सेंटर आणि महाशक्ती ॲम्बुलन्स असोसिएशन तसेच कोल्हापुरातील नामवंत हॉस्पिटल,जीपीएचे अध्यक्ष डॉ. सातपुते डॉ. शीतल पाटील यांच्या सह, प्रमुख डॉक्टर्स सहभाग घेऊन मराठा आरक्षण मराठा बांधवांसाठी आरोग्याची दक्षता घेत ठिकठिकाणी ॲम्बुलन्स व मेडिकल कॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्य दसरा चौक सभेच्या ठिकाणी व्हाइट हाऊस मध्ये नेत्र तपासणी पासून ते मुख्य आरोग्य तपासणीपर्यंत सर्व सोय केली असून याची मराठी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य प्रसिद्ध डॉ. संदीप पाटील यांनी केले आहे.

Advertisements

प्रमुख उपस्थिती जीपीएचे अध्यक्ष डॉक्टर सातपुते डॉक्टर शीतल पाटील, मराठा महासंघाचे शशिकांत पाटील वसंत (नाना) मुळीक, अवधूत पाटील ॲड. धनंजय पठाडे, स्मार्ट आर्ट वर्ल्डचे उदय पाटील इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *