कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेल्या 100 ई बसेस फेब्रुवारी पर्यंत आणण्यासाठी प्रयत्नशिल , : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर दि, केंद्र सरकारच्या योजनेतून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेल्या १०० ई-बसेस फेब्रुवारी अखेरीस कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. या ई-बसेससाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी आणि पूर्ततेसाठी, खासदार धनंजय महाडिक यांनी आज महापालिका अधिकार्‍यांशी चर्चा केली. विद्युतीकरणाचा २६ कोटीचा आणि पायाभूत सुविधांसाठी १२ कोटीचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, त्याचा आपण पाठपुरावा करु, असे खासदार महाडिक यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे नव्या वर्षात कोल्हापूरवासीयांना १०० ई-बसेसची गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे.

  कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागाची आर्थिक हलाखी लक्षात घेवून आणि नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारकडे कोल्हापूर शहरासाठी १०० ई-बसेसची मागणी केली होती.सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मागणी मान्य झाली असून, फेब्रुवारीपर्यंत सुमारे शंभर बसेस कोल्हापूरत येण्यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रयत्नशिल आहेत. या पार्श्‍वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी आज महापालिका अधिकार्‍यांशी चर्चा केली. नव्या ई-बसेससाठी कोल्हापुरात अत्यावश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये ई -बसेसच्या चार्जिंगसाठी स्वतंत्र विद्युत यंत्रणा, चार्जिंग स्टेशन, प्रशासकीय इमारत, कर्मचार्‍यांसाठी विश्रांती स्थान, पार्किर्ंग व्यवस्था अशा कामांचा समावेश आहे. पुईखडी ते केएमटी वर्कशॉप या साडेआठ किलोमीटर लांबीच्या मार्गावर, ३३ केव्ही क्षमतेची स्वतंत्र विद्युत वाहिनी टाकणे गरजेचे आहे. तसेच केएमटी वर्कशॉपमध्ये ३५ चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील. अशा विद्युतीकरणाच्या कामासाठी २६ कोटी रुपये खर्च येणार आहे. शिवाय अन्य पायाभूत सुविधांसाठी १२ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या दोन्ही खर्चांचे प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठवले आहेत, अशी माहिती महापालिका अधिकार्‍यांनी बैठकीत दिली.

Advertisements

या प्रस्तावांचा आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शंभर ई बसेस कोल्हापुरात येतील, यासाठी प्रयत्न करत असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. १०० ई-बसेसचे शहरवासीयांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रसंगी जिल्हा नियोजन मंडळ आणि राज्य शासन यांच्याकडेही निधीसाठी पाठपुरावा केला जाईल, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार महाडिक यांच्याशी झालेल्या चर्चेत अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे, केएमटीचे सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, अधीक्षक पी. एन. गुरव, विद्युत विभागाचे सहाय्यक अभियंता अमित दळवी, दीपक पाटील, नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, वैभव माने यांनी भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *