चर्चा फिक्सिंगची बदनामी कोल्हापुरच्या फुटबॉलची…!

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

 

अजय शिंगे – कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अव्वल गटातील फुटबॉल स्पर्धेत मॅच फिक्सिंग झाल्याचे संदेश सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. एखाद्या सामन्यात एका संघाकडून चांगल्या खेळाचे प्रदर्शन झाले नाही म्हणजे ती मॅच फिक्स असे काही मत बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले जाते या मधून कोल्हापूर फुटबॉलचे

Advertisements

नाव कुठेतरी खराब होत चालले आहे अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये सुरू आहे. 

कोल्हापुरच्या फुटबॉलला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जर अशा ठिकाणी जाणीवपूर्वक एखाद्या संघाची बदनामी व्हावी या हेतूने सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचे संदेश पसरवले जात असेल तर यातून फक्त संघाची नाही तर पूर्ण कोल्हापूरच्या फुटबॉलची बदनामी होत आहे. या गोष्टी कडे क्रीडा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. आत्ताच झालेल्या एका सामन्यात 6-0 अशा गोलफरकाने एका संघाने विजयी मिळवला. या मॅच नंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिक्सिंगचे संदेश फिरू लागले एका गोल साठी एवढे पैसे एका मॅच,साठी एवढे पैसे एवढंच नाहीतर यावर विविध वृत्तपत्रात त्या संदर्भातील बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या.कोल्हापूरातील सर्व संघ वर्षभर सराव करून पैसे खर्च करून बाहेरील खेळाडू संघात घेऊन संघाची बांधणी करतात. अशा वेळी काही लोकांच्या सोशल मीडियावरील चर्चेमुळे कुठेतरी संघाचे मनिसिक खच्चिकरण होते.या आधी स्टेडियम मध्ये विविध प्रकरच्या घटना घडल्या आहेत. पण सध्या सुरू असलेल्या फिक्सिंग या प्रकरणाने सिनियर फुटबॉल खेळाडू, सर्व संघ आणि क्रीडाप्रेमीं मधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हे संदेश कोण तयार करते कोण व्हायरल करते यांचा उद्देश नक्की काय हे फुटबॉल समर्थक आहेत की दुसरे कोणी याची नक्किच चौकशी व्हावी.अशा प्रकारच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींवर कुठेतरी बंधने आली पाहिजेत यासाठी प्रशासनाकडून योग्य ते निर्बंध घालण्यात यावे अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे. एखाद्या संघाला विरोध करण्यासाठी काही लोकांकडून झालेली चर्चा संपूर्ण कोल्हापूरकरांचे मत असू शकत नाही. हुल्लडबाजी, हाणामारी, पांचावर झालेले आरोप, केएसए वर झालेले आरोप,अशा विविध प्रकारच्या घटनांनी कोल्हापूरच्या फुटबॉलला नेहमीच गालबोट लागत आले आहे. आणि आता तर थेट फिक्सिंग प्रकरण, यातील सत्यात काय हे येणाऱ्या काळात नक्कीच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *