Share Now
Read Time:1 Minute, 39 Second
पन्हाळा प्रतिनिधी/शहादुद्दीन मुजावर
पन्हाळा येथील सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पन्हाळा युवा प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक वर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.
यामध्ये वृक्षारोपण, बालग्राम मधील अनाथ मुलांना खाऊ वाटप, दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर दिवाळी निमित्त फराळ वाटप, दीपोत्सव, शालेय साहित्य वाटप, शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर असे अनेक उपक्रम राबवले जातात.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सोमवार ता. १९ रोजी शिवजयंती निमित्त सकाळी ९ ते २ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिष्ठानतर्फे गेली आठ वर्षे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर घेण्यात येते. यामध्ये १०० हून अधिक रक्तदाते रक्तदान करतात.
याचा उपयोग अनेक गरजू रुग्णांना होतो. यावर्षी होणारे रक्तदान शिबीर हे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर समोर असणाऱ्या पन्हाळा नगरपरिषद येथे होणार असून जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
Happy
0
0 %
Sad
0
0 %
Excited
0
0 %
Sleepy
0
0 %
Angry
0
0 %
Surprise
0
0 %
Share Now