वरसे ग्रामपंचायतमधील युवा नेतृत्व अमित मोहिते यांची वरसे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड.

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 11 Second

 

(दिपक भगत-रोहा प्रतिनिधी):-गेली अनेक वर्षे राजकारणाच्या माध्यमातुन समाजकारण करणारे निवी गावाचे युवक अमित मोहिते यांची प्रतिष्ठित समजल्या जाणा-या ग्रुप ग्रामपंचायत वरसे सरपंचपदी आज बिनविरोध निवड झाली.विभागातील एका तरुण,तडफदार नेतृत्वाला सरपंचपदाची जबाबदारी मिळाल्याने निवी गावासह समस्त विभागातुन अमित मोहिते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तटकरेंचे निकटवर्तीय,रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे तरुण नेतृत्व अशी ओळख आहे.अमित मोहिते यांची गाव पातळीवरील राजकारणावर उत्तम पकड असल्याच अनेकवेळा सिद्ध झालेले आहे.सदस्य,उपसरपंच अशा पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळित, अनेक समाजहितची कामे करीत तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेले अमित मोहिते आज बिनवोरोध सरपंचपदी विरामान झाले आहेत.सुरुवतीला नरेश पाटील यांना सरपंच पदाची तीन वर्षाची प्रथम कारकीर्द दिली. त्यानंतर अमित मोहिते यांना सरपंच पदाचा मान दिला जाईल. सरपंच नरेश पाटील यांनी ठरल्याप्रमाणे अत्यंत प्रामाणिकपणे सरपंच पदाचा राजीनामा देत मोकळ्या केलेल्या सरपंच पदाच्या खुर्चीत अखेर युवा नेतृत्व अमित मोहिते यांना सन्मानाने बसविले.अमित मोहिते यांची वरसे ग्रामपंचायत सरपंचपदी नियुक्ति झाल्याने वरसे ग्रामपंचायत नागरीकांसह निवी ग्रामस्थाना अधिकच आनंद झाल्याच बोलल जात आहे.कारण सहा दशकानंतर प्रथमच निवी गावाला सरपंच पदाचा बहुमान मिळाल्याने एकच जल्लोष झाला आहे.गावाला मिळालेल्या या बहुमानाबद्दल ग्रामस्थांनी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.
यावेळी बोलतान अमित मोहिते म्हणाले कि,आजचा क्षण हा माझ्यासाठी भावनिक आहे.अनेक दशकानंतर माझ्या निवी गावाला सरपंचपदाचा बहुमान मिळाला याच समाधान आणि आनंद आहे.

मिळालेल्या संधीचा यथोचित उपयोग वरसे ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांसाठी,ईतर समाज घटकांची सेवा करण्यासाठी करेन.तसेच खा.सुनिल तटकरे,मंत्री.अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांचे आभार मानीत वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी पुरेपुर प्रयत्न करेन. जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत उत्तम कारभार करणार असल्याचे देखील सांगितले. या सरपंचपद निवडीच्या वेळी भारत सावंत यांनी अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहत अमित मोहिते यांना सरपंच नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, सरपंच महेंद्र पोटफोडे, सतीश भगत, राम नाकती, माजी सरपंच नरेश पाटील,माजी उपसरपंच मधुकर बामुगडे,रामा म्हात्रे, यांसह अनेक पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमित मोहिते सरपंचपदाला योग्य तो न्याय देतील अशी भावना अनेकांनी बोलुन दाखवली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *