महाराष्ट्र परिचय केंद्र (दिल्ली), आणि कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र परिचय केंद्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्र (दिल्ली) आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून  अभिवादन करून मनोगत व्यक्त केली . यावेळी  कार्यलयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Advertisements

कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन.

 मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी श्री. अडसूळ, सहायक संचालक व अतिरिक्त जिल्हा माहिती अधिकारी सांगली फारुक बागवान, माहिती अधिकारी वृषाली पाटील व रणजित पवार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

  याप्रसंगी विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *